*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
*गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इ.8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत,स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत सरकारी शाळेतील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत, स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबतच राबविला जात
आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीती मूल्य रुजून, त्यांना जबाबदार नागरिक बनविणे हा आहे, 28 जुलै 2026 पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप तसेच, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली,
नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय येथे एसपीसी नोडल अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे, महिला अंमलदार श्रीमती मीना पवार तसेच दीपक वळवी, कवायत शिक्षक पोलीस मुख्यालय नंदुरबार यांनी, वाहतुकीचे नियम पाळताना घ्यायची काळजी, शस्त्र विषयी माहिती, व शस्त्र हाताळणी, डायल 112, महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले ,
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे व त्यांचा कर्मचारी उपस्थित होते.