*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल पुणे,कोल्हापूर महामार्ग वरील अनुस्कुरा घाटा मध्ये अति पाऊसच्या जोरा मूळे दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्यावरती मधोमद येवून थांबला होता. प्रवाशांना ये जा करताना त्याचा अडथळा होत होता. प्रवाशांची एकंदरीत कोंडी होत होती. त्या मध्ये कायम स्वरूपी असलेल्या धुक्याचा प्रार्दुभाव हे लक्षात येताच सकाळी झाडे लावलासाठी गेलेल्या खापणे
महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी एकीचे बळ दाखवत एक वेगळा संदेश दिला. श्री कृष्णाने रानामध्ये गाई चारताना गुराखी व सर्व जनावरे अख्या पर्वता खाली समाविष्ठ केली होती. श्री कृष्णाने संवगड्यांच्या साहयाने अख्या पर्वताला उचलून एकीचे बळ सत्य युगामध्ये दाखवून दिले होते. त्याचेच हे काही कलीयुगामधले एकही हत्यारे, अवजारे नसताना खापणे
महाविद्यालयाच्या स्वयंम सेवकांनी एकीचे बळ काय असते ते जिवंत दाखवून दिले. हा एक समाजाला बोध घेण्यासारखा आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी जर का अनुस्कुरा घाटात रस्त्यावर पडलेला तो भला मोठा महाकाय दगड हटकला नसता तर वाहतुकीसाठी खुला रस्ता मिळाला नसता. प्रशासन, बांधकाम विभाग यांची वाट न बघता विद्यार्थानी प्रवाशांना रस्ता मोकळा करून दिला. बांधकाम विभाग जिसीबी पाठवून देईल नंतर रस्ता मोकळा होईल ह्याची वाट न बघता तो भला मोठा कुंभकर्णा सारखा दगड हाताने ढकलत रस्त्यालगत नेवून लावला. त्यामळे बांधकाम विभागाने खापणे कॉलेजच्या मुलांचे अभिनंदन करावे.
अनुस्कूरा घाटाच्या पहिल्याच वळणावर हा भला मोठ दगड आला होता. धुक्यामूळे सहाजिकच रस्त्यावर अपघात होणार हे जानून घेवून प्रवाशाना रस्ता मोकळा करून देताना खापणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक अपघात वाचवले असे बोलण्यास वावगे ठरणार नाही. वेगाने येणारे पर्यटक आणि रस्त्याच्या मधोमध पडलेली दगडमय दरड यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे लक्षात येताच स्वयंसेवकांनी रस्ता व रस्त्याच्या बाजूचा सर्व परिसर साप केला आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. यावेळी खापणे कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा.एस.जी. चव्हाण, मधुकर साटम यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी, उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपले झाडे लावण्याचे काम बाजूला ठेवून केलेल्या या कार्याचे कौतुक पर्यटक, तसेच प्रवाशी, आणि परिसरातील नागरिकाकडून होत आहे.



