*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
जावडे(प्रतिनिधी):-लांजा तालुक्यातील
हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे येथे शनिवारी दि.25 जुलै 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत लोकशाहीचा पहिला धडा गिरवला.
गेल्या आठवडा भरापासून शाळेत निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक समितीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, उमेदवारी अर्ज भरणे, चिन्हांचे वाटप, प्रचार, आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजणी, खातेवाटप आणि शपथविधी अशा सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्या. विशेष म्हणजे मतदानासाठी अत्याधुनिक ईव्हीएम ॲपद्वारे (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)चा वापर करण्यात आला. उमेदवारांनी वर्गागणिक जाऊन आपल्या निवडणूक चिन्हाची माहिती विद्यार्थ्यांना देत मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण शाळेत निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची प्रभावी ओळख झाली.
संस्थेचे संस्थापक तथा पत्रकार संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. निवडणुकीनंतर संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अपर्णा पवार यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, लोकशाही मूल्ये आणि संघभावना विकसित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत मुख्याध्यापक गजानन पांचाळ यांनी व्यक्त केले.



