*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
*'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' साठी नोंदणी सुरू, जिल्ह्यातील तरुणांना जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक दर्जाच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य क्षेत्रांमध्ये देशातील प्रतिभावान तरुणांना आपले प्राविण्य आणि गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेतर्फे (NSDC) 'इंडिया स्किल स्पर्धा 2026-27' (India Skill Competition 2026-27) चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभाग नोंदवून जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. स्पर्धेचे स्वरूप व जागतिक महत्त्व:
जागतिक कौशल्य स्पर्धा (WorldSkills Competition) ही दर दोन वर्षांनी होणारी जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून ती ऑलिम्पिक खेळांप्रमाणेच अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. 2027 मधील जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी 56 विविध कौशल्य क्षेत्रांशी संबंधित जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवड चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), सेक्टर स्किल कौन्सिल (Sector Skill Council) व विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय निवड प्रक्रियेतून पुढे जाणारे स्पर्धक 'वर्ल्ड स्किल्स 2027' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. पात्रतेचे निकष व वयोमर्यादा: सामान्य 56 कौशल्य क्षेत्रे: उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी 2003 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे (वय 23 वर्षांपर्यंत). टीम स्किल्स (Cyber Security, Industry 4.0, Mechatronics, Robot Systems Integration): जन्म दिनांक 01 जानेवारी 2003 किंवा तदनंतरचा.
• टीम स्किल्स (Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work, Landscape Gardening): जन्म दिनांक 01 जानेवारी 2006 किंवा तदनंतरचा.
सहभागी होऊ शकणाऱ्या संस्था:
जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आयटीआय (ITI), पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये, एमएसएमई टूल्स रूम्स, सीआयपीईटी, आयआयटी, आयएचएम, हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट टेक्निकल संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीईटी व इतर सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी व उमेदवार यामध्ये सहभागी होऊ शकतात. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन 'Indian Skills' या विभागांतर्गत आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त वाघ यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



