*विहिरीत पडलेल्या गोल्डन जॅकलच्या पिल्लाची सर्पमित्रांकडून सुखरूप सुटका
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विहिरीत पडलेल्या गोल्डन जॅकलच्या पिल्लाची सर्पमित्रांकडून सुखरूप सुटका
*विहिरीत पडलेल्या गोल्डन जॅकलच्या पिल्लाची सर्पमित्रांकडून सुखरूप सुटका*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार 13 जुलै 2026 रोजी शहरातील नळवा रोड परिसरातील माँ कस्तूरी नगर लगत असलेले शेतकरी सतीश पाटील यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे 5 ते 7 महिन्यांचे गोल्डन जॅकल (सियार/कोल्हा)चे पिल्लू पडल्याची माहिती सर्पमित्र ओम कोडग यांना मिळाली. माहिती मिळताच सर्पमित्र ओम कोडग व त्यांचे सहकारी सर्पमित्र राहूल कोळी यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. व आवश्यक सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत त्यांनी विहिरीत उतरून गोल्डन जॅकलच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली.
बचावकार्य यशस्वी झाल्यानंतर संबंधित वन्यप्राण्याला कोणतीही इजा झाली आहे का नाही? त्याची तपासणी करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा वन्यप्राण्यांना इजा न करता तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. या धाडसी व तत्पर बचाव कार्याबद्दल शेतकरी व परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र ओम कोडग व राहुल कोळी यांचे कौतुक केले.



