*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-एकीकडे भातलावणीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असताना दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात सर्प दंशाच्या घटना वाढल्या आहेत
रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सर्प दंशाच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे बाधितांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही भातशेतीची कामे करताना अचानक समोर आलेल्या सापांनी या सर्वांवर हल्ला केला यामध्ये गोळप येथील 52 वर्षीय गिरीश कृष्णा मयेकर, लांजा तालुक्यातील खानवली येथील 65 वर्षीय संजीवनी जयवंत गुरव, तसेच रत्नागिरीतील 65 वर्षीय मीरा पांडुरंग होरंबे आणि कोतवडे येथील 50 वर्षीय स्नेहलता एकनाथ धुमक याशिवाय गुहागर तालुक्यातील नरवण येथील 87 वर्षी वृध्द महिला लक्ष्मी दत्तात्रय देवूडकर आणि बसणी येथील 20 वर्षीय तरुण आराध्य महेश नेवरेकर हे सुध्दा सर्प दंशाचे बळी ठरले. भात लावणीचा हंगाम असल्याने शेतकरी वर्ग सकाळपासून शेतामध्ये चिखलात काम करत आहे. वाढलेले गवत आणि साचलेले पाणी यामुळे सापांचा वावर वाढला असून अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. मात्र घटना घडताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्प दंश झालेल्या 6 जणांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने कोणतीही वेळ न दवडता या सर्वांवर तात्काळ आपत्कालीन उपचार सुरू केले रुग्णालयातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे या सहाही जणांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरु आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



