*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
मुंबई(प्रतिनिधी):-बेस्ट उपक्रम आर्थिक संकटातून सावरावा यासाठी 23 आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्वागतार्ह आहे. परंतु हा निर्णय राबविताना मराठी माणूस, कामगार आणि मराठी उद्योजक यांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केली आहे. बेस्ट ही केवळ वाहतूक सेवा नसून मुंबईतील लाखो मराठी कुटुंबांचा आणि कामगारांचा उदरनिर्वाहाचे स्रोत आहे. त्यामुळे या प्रकल्पात पारदर्शकता आणि स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे.
आमच्या मागण्या, कामगारांचे हित: प्रकल्पादरम्यान कोणत्याही बेस्ट कामगाराची नोकरी जाऊ नये. नवीन प्रकल्पात बेस्ट कामगार आणि त्यांच्या पाल्यांना रोजगारात प्राधान्य द्यावे. बेस्ट सेवेचा दर्जा, व्यावसायिक विकासाबरोबरच बसेसची संख्या 5000 ने वाढवावी. प्रवाशांची गर्दी कमी करून सेवा अधिक चांगली करावी. मराठी जनतेचा हक्क आगारातील व्यावसायिक गाळे, दुकाने, ऑफिस यामध्ये 80% आरक्षण मराठी उद्योजक, स्थानिक व्यापारी आणि महिला बचत गटांसाठी ठेवावे. मराठी उद्योजकांना संधी PPP टेंडरमध्ये मोठ्या कंपन्यांबरोबरच लघु व मध्यम मराठी उद्योजकांनाही सहभागी करून घ्यावे. भाडे परवडणारे ठेवावे.
बेस्टच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या विकासासाठी वापरले जावे. ही आमची ठाम भूमिका आहे.
तरी आपण या मागण्यांचा सकारात्मक विचार करून धोरणात समावेश करावा अशी विनंती श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी मुख्यमंत्री, महापौर आणि महाव्यवस्थापक बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम BEST मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



