*सिंधी कॉलनीच्या शिव मंदिरात सामुहिक आरतीने पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिंधी कॉलनीच्या शिव मंदिरात सामुहिक आरतीने पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे*
*सिंधी कॉलनीच्या शिव मंदिरात सामुहिक आरतीने पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील सिंधी कॉलनीतील गुरु जो दर मंदिराजवळील शिव महादेव मंदिरात सोमवारी सायंकाळी शंभराहून अधिक भाविकांनी सामूहिक महाआरती केली. याप्रसंगी उपस्थित भाविकांनी शंकर भोलेनाथ यांना नंदनगरीत शिवगंगा अवतरण्याची विनंती करण्यात आली. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी बांधवांसह व्यापारी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. नंदुरबार शहर व परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी सिंधी कॉलनीतील शिव मंदिरात भाविकांनी सामूहिक आरती करून महादेवाला साकडे घातले.
यावेळी बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार खानवाणी, मोहन खानवाणी, लेखराज नामकानी, शंकर रंगलानी, डॉ. अर्जुन लालचंदानी, अहमदाबाद येथील भरत छाबडा, पुणे येथील हरेश आहूजा, महादू हिरणवाळे, गोपीचंद खानवाणी, जगदीश गुरुबक्षानी, जयराम कालानी, रमेश गुरुबक्षांनी, कारा मंदाना, विष्णूभाई फ्रिजवाले, मनोहर सोनार, यांच्यासह शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



