*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये 'सीड्सबॉल' कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी 'सीड्सबॉल निर्मिती कार्यशाळा' मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सीड्सबॉल तयार करत निसर्ग संवर्धनाची प्रेरणा घेतली. कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती दिपाली पालवे यांनी सीड्सबॉल तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. सीड्सबॉल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याची योग्य पद्धत तसेच रुक्ष व डोंगराळ भागात वृक्षलागवड आणि वनसंवर्धनासाठी त्याचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इको क्लबचे समन्वयक किशोर रौंदळ यांनी केले. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांनी कडुनिंब, चिंच, बोर, गुलमोहर, जांभूळ, आंबा, सीताफळ आणि पेरू आदी विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून उत्साहाने सीड्सबॉल तयार केले. या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच निसर्गप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत निंबाजीराव बागुल होते. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्रीकांत कोकणी यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. प्रात्यक्षिकासाठी शाळेचे सहशिक्षक जगदीश वंजारी व मनीष सनेर यांनी मोलाची मदत केली. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी व पर्यवेक्षिका श्रीमती सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता वाढीस लागली असून "एक विद्यार्थी – अनेक वृक्ष" हा संदेश प्रभावीपणे रुजविण्यात कार्यशाळेला यश आले.



