*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
*संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मधील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-1 जुलै 2026 रोजी बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या टीमने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूरच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी सर्व विध्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन, दात तपासणी रक्तदाब तसेच इतर सामान्य तपासणी करण्यात आली. सर्व मुलींना मासिक पाळी विषयी तसेच आरोग्या विषयी स्वच्छता कशी राखावी या विषयी किशोर वयीन मुलींना डॉ सेजल सावंत यांनी मार्गदर्शन केले डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. गणेश फड, डॉ. सेजल सावंत तसेच सर्व नर्स यांनी सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी आणि आहार तसेच हात धुण्याच्या पद्धती सांगितल्या. यावेळी मुख्याध्यापक चंदनशिवे बी. एच. यांनी सर्व डॉक्टर आणि नर्स यांचे स्वागत केले आणि आभार कोदारे यांनी मानले.