*कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुवर्णसंधी, शेतकरी, एफपीओ व संस्थांनी लाभ घ्यावा, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला वेग, 20 जुलैपर्यंत जनजागृती, मार्गदर्
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुवर्णसंधी, शेतकरी, एफपीओ व संस्थांनी लाभ घ्यावा, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला वेग, 20 जुलैपर्यंत जनजागृती, मार्गदर्
*कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुवर्णसंधी, शेतकरी, एफपीओ व संस्थांनी लाभ घ्यावा, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला वेग, 20 जुलैपर्यंत जनजागृती, मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक व आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund-AIF) योजनेअंतर्गत दि. 19 जून ते 20 जुलै 2026 या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक दीपक एस. पटेल यांच्या वतीने करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सन 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) योजना कापणीनंतरच्या (Post-Harvest) कृषी पायाभूत सुविधांची उभारणी तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देते. या सुविधांमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. योजने अंतर्गत बँकांकडून मंजूर होणाऱ्या रु. 2 कोटींपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि कृषी व्यवसायाला बळकटी देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेंतर्गत गोदामे, शीतगृहे (Cold Storage), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट (SHGs) तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांना घेता येणार आहे.
विशेष अंमलबजावणी मोहिमेदरम्यान जिल्हाभर शेतकरी मेळावे, जनजागृती अभियान, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळा जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात येणार असून, योजनेबाबत अधिकाधिक लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक तसेच इतर लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी चेतन भारडे, वित्त विशेषज्ञ, नंदुरबार यांच्याशी मो. 9595388155 वर संपर्क साधावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी कळविले आहे.



