*सखोल पुनरिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-विजय चौधरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सखोल पुनरिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-विजय चौधरी*
*सखोल पुनरिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-विजय चौधरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजयभाऊ चौधरी यांनी केले. 3 ते 6 जुलै 2026 या कालावधीत विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा, शहादा शहर, म्हसावद, तळोदा शहर, तळोदा ग्रामीण आणि अक्कलकुवा मंडळांचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकींमध्ये त्यांनी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, BLO यांच्यासोबत BLA-2 यांनी प्रत्येक बूथवर जाऊन मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करावे. त्यासाठी मतदार यादी सोबत घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी. मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या (Correction), नावे वगळणे (Deletion) तसेच नवीन मतदारांची नोंद (Addition) ही कामे काळजीपूर्वक पूर्ण करावीत. बोगस व मयत मतदारांची नावे वगळून पात्र नवीन मतदारांचा समावेश करावा. विशेष सखोल पुनरिक्षण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून सक्षम लोकशाही आणि सुरक्षित राष्ट्र उभारणीशी संबंधित महत्त्वाचे कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
मतदारांनीदेखील BLO व BLA-2 यांना आवश्यक सहकार्य करून मतदार यादी अचूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विजय चौधरी यांनी केले. यापूर्वीही या अभियानाच्या अनुषंगाने त्यांनी विसरवाडी व नवापूर मंडळांचा दौरा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस ॲड. सत्यानंद गावित, जिल्हा सरचिटणीस बळीराम पाडवी व कैलास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष आशा पाडवी, जिल्हा सचिव राहुल शेंडे, रमेश वसावे, शहादा विधानसभा प्रमुख नारायण ठाकरे, विलास डामरे, जितेंद्र सूर्यवंशी, अजय परदेशी, विनोद जैन, शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, तळोदा ग्रामीण मंडळाध्यक्ष दरबार पाडवी, अक्कलकुवा मंडळाध्यक्ष नितेश पाडवी, लोणखेडा मंडळाध्यक्ष नितीन पाटील, म्हसावद मंडळाध्यक्ष विश्वास ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



