*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नंदरबार व पंचायत समिती,तालुका गट साधन केंद्र नंदुरबार यांचे संयुक्त आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नंदरबार व पंचायत समिती,तालुका गट साधन केंद्र नंदुरबार यांचे संयुक्त आयोजन*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नंदरबार व पंचायत समिती,तालुका गट साधन केंद्र नंदुरबार यांचे संयुक्त आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP- 2020) अंतर्गत इयत्ता 6 वीच्या नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उदेशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार तसेच पंचायत समिती, तालुका गट साधन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित तालुकास्तरीय प्रशिक्षक (TOT) प्रशिक्षणास रविवार, 6 जुलैपासून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हे प्रशिक्षण श्रीफ हायस्कूल, नंदुरबार येथे 6 जुलै ते 9 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे, या चार दिवसीय' प्रशिक्षणात तालक्यातील विविध शाळांमधील शिक्षक व प्रशिक्षक सहभागी झाले असून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची संकल्पना, विषयनिहाय अध्यापन पध्धती, अध्ययन निष्पत्ती, अनुभवाधारित शिक्षण, कूतीप्रधान अध्यापन, सतत सर्वकष मूल्यमापन, कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' तसेच विद्यार्थी केंद्रित अध्यापन याबाबत सखोल मागेदशेन करण्यात येत आहे. प्रात्यक्षिके, गटचर्चा, सादरीकरणांतून मिळत आहे मार्गदर्शन
प्रशिक्षणादरम्यान विषयतउज्ञांकडून प्रात्यक्षिके, गटचर्चा, कृतीसत्रे, सादरीकरणे आणि अध्यापनातील नाविन्यपणे उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
विद्यार्थ्योच्या सर्वागीण विकासाला चालना
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्याध्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि जीवनोपयोर्ग कौशल्यांचा विकास घडवून आणणे हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उदिष्ष असून त्याद्ृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



