*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये जगन्नाथपुरी यात्रा उत्सव संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये जगन्नाथपुरी यात्रा उत्सव संपन्न*
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये जगन्नाथपुरी यात्रा उत्सव संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-7 जुलै2026 श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कुल मध्ये जगन्नाथपुरी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आला. शाळेच्या पुर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उत्सवात कृतियुक्त सहभाग नोंदवला. मुख्यत्वे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सूभद्रा यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी आकर्षणाचे केंद्र बनले. त्यात काही विद्यार्थ्यांनी भगवान जगन्नाथ यांचा जीवनावर नाटक, सादर करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी दिंडी, रथ, यामध्ये सहभाग घेतला. सतिश बागुल सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थांना यात्रेचे महत्व पटवुन सांगितले. शाळेतील सांस्कृतिक विभागाने उत्कृष्टरीत्या कार्य पार पाडले.



