*कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन, 9 जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे कार्यशाळा, शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी ला
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन, 9 जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे कार्यशाळा, शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी ला
*कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन, 9 जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे कार्यशाळा, शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घ्यावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund-AIF) योजनेबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नंदुरबार यांच्या वतीने 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन असे आवाहन ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक दीपक एस. पटेल यांनी यांनी केले आहे.
कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ऑगस्ट 2020 मध्ये सुरू करण्यात आली असून, कापणी नंतरच्या (Post- Harvest) कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या रु. 2 कोटींपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत गोदामे, शीतगृहे (Cold Storage), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव- इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था(PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट (SHGs) तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांना घेता येणार आहे.
जिल्हास्तरीय कार्यशाळेत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, बँक कर्ज, व्याज सवलत, क्रेडिट गॅरंटी तसेच विविध कृषी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना योजना प्रभावीपणे समजून घेण्यास व त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असेही ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी यांनी केले आहे.



