*महाराष्ट्रात उभारले जाणार 'ईव्ही चार्जिंग स्टेशन'चे जाळे, युवक आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी!*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्रात उभारले जाणार 'ईव्ही चार्जिंग स्टेशन'चे जाळे, युवक आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी!*
*महाराष्ट्रात उभारले जाणार 'ईव्ही चार्जिंग स्टेशन'चे जाळे, युवक आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘गो ग्रीन इंडिया’ ("Go Green India") आणि "सस्टेनेबल मोबिलिटी" ही संकल्पना मांडली आहे. याच संकल्पनेला सक्रिय पाठबळ देत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या स्वायत्त संस्थेच्या वतीने राज्यभरात 'ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून देशात व राज्यात पेट्रोल पंपांप्रमाणेच आता ईव्ही चार्जिंग स्टेशनची नितांत गरज भासत असल्याने अमृतने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे, या संधीचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यातील युवक -युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), एमएसएमई (MSME) घटक, शेतकरी उत्पादक गट आणि ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना अमृत संस्थेकडून खालीलप्रमाणे मदत केली जाईल:
प्रशिक्षण व सल्ला: ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण,व्यवसाय नियोजन आणि प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे. तांत्रिक मार्गदर्शन: चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे दिले जातील. आर्थिक सहाय्य: व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अमृतच्या 'वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा' लाभ उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल. भविष्यात ईव्ही क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणारे उद्योग क्षेत्र ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, त्याचे संचालन व व्यवस्थापन, उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, फ्रँचायझी मॉडेल आणि ग्रामीण भागामध्ये चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन आणि ईव्ही उपकरण विक्री यांसारख्या क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाची सामाजिक जबाबदारी म्हणून अमृतने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळून हरित ऊर्जा वापर वाढेल आणि महाराष्ट्र आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिकृत संकेतस्थळ: www.mahaamrut.org.in अर्ज करण्याची पद्धत: संकेतस्थळावरील 'योजना' (Scheme) विभागात जाऊन, 'विशेष योजना' मेनू अंतर्गत 'EV Charging Station Partner' या पर्यायावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संपर्क: राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक आणि कार्यालयाचे पत्ते संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. नंदुरबार जिल्हा संपर्क: जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे (+91 91122 28771) ईमेल: amrut.nandurbar.dm@gmail.com जिल्हा संपर्क दुवा: mahaamrut.org.in/coordinators-contact



