*नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळातर्फे दहावी -बारावी व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळातर्फे दहावी -बारावी व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
*नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळातर्फे दहावी -बारावी व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंताचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून आदर्श शिक्षिका श्रीमती शकुंतला जायभाये उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्रीमती शकुंतला जायभाये यांनी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर दहावी व बारावी परीक्षेत तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी समर्थ काकडे आणि कृतिका सांगळे यांनी मनोगत व्यक्त करून नंदुरबार जिल्हा वंजारी महिला मंडळाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पालकांच्या वतीने श्रीमती सुरेखा देविदास पेटकर यांनी मनोगत व्यक्त करत महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्या आदर्श शिक्षिका श्रीमती शकुंतला जायभाये यांनी महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक करत महिला मंडळास पाच हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. आपल्या मनोगतात त्यांनी "समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र राहावे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रत्येक महिलेने स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा," असे आवाहन केले.
महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अर्पणा पालवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला मंडळाने वर्षभरात राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्षा श्रीमती विद्या गाभणे यांनी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यास महिला मंडळ भविष्यात उपक्रम करण्यात येतील, असे सांगितले.
या कार्यक्रमाला समाजातील विद्यार्थी, पालक, महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये टीना फटकाळ, वैशाली काकडे, सुवर्णा काळे, तन्वी नागरे, प्रियंका वंजारी, मनीषा साबळे, सरोजिनी काकडे, उज्वला काकडे, कविता आघाव, मीरा शिंत्रे, भारती आव्हाड, सुरेखा देविदास पेटकर, कमल भाबड, पल्लवी भाबड, अनिता दराडे, सीमा दराडे, शीतल नागरे, रंजनी उगले, अलका सांगळे, प्रभावती शिंत्रे, नेहा पाटील आणि कल्पना सांगळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अर्पणा पालवे, उपाध्यक्षा श्रीमती विद्याताई गाभणे, कोषाध्यक्षा श्रीमती योगिता काकडे, ज्योती दापूरकर, श्रीमती कल्पना फटकाळ, श्रीमती वैशाली गीते तसेच उज्वला गंडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन योगिता काकडे यांनी तर आभार मनीषा शिंत्रे यांनी मानले.



