*नंदुरबार जिल्हा केळी बोर्डाच्या स्थापनेसाठी एक पाऊल पुढे, आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा केळी बोर्डाच्या स्थापनेसाठी एक पाऊल पुढे, आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
*नंदुरबार जिल्हा केळी बोर्डाच्या स्थापनेसाठी एक पाऊल पुढे, आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना व्हावी, या मागणीसंदर्भात शहादा तहसील कार्यालयात आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सदर बैठक 26 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीचा पुढील टप्पा म्हणून आयोजित करण्यात आली होती. बैठकीस केळी उत्पादक संघर्ष समिती (नंदुरबार जिल्हा), रयत शेतकरी संघटना, नंदुरबार केळी व पपई फळ बागायतदार संघ, केळी उत्पादक शेतकरी संघ तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, केळीला मिळणारा बाजारभाव, निर्यातीच्या संधी, साठवणूक सुविधा, प्रक्रिया उद्योग तसेच उत्पादनाच्या विपणना संदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील वाढते केळी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता नंदुरबार येथे स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना करण्याची मागणी उपस्थितांनी एकमुखाने केली.
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सांगितले की, नंदुरबार जिल्हा केळी बोर्ड स्थापनेचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात प्रभावीपणे मांडला जाईल. तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून नंदुरबार जिल्ह्यास स्वतंत्र केळी बोर्ड मंजूर व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उपस्थित शेतकरी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीही नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना तातडीने करण्याची जोरदार मागणी केली.



