ताजा खबरे:
*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून

  • Share:

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून पाठपुरावा*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्य शासनाने आपला गौरवशाली इतिहास जपण्यासाठी अनेक शहरांची परकीय आणि जुनी नावे पालटून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत. यामध्ये 'औरंगाबाद' चे 'छत्रपती संभाजीनगर', 'अहमदनगर'चे 'अहिल्यानगर', 'उस्मानाबाद'चे 'धाराशिव', तसेच 'इस्लामपूर'चे 'ईश्वरपूर' आणि 'वेल्हे'चे 'राजगड' असे नामकरण करण्यात आले आहे; मात्र महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अद्यापही औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद अशी जुनीच आणि परकीय नावे सर्रास झळकत आहेत. ही जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी शासनाने मंजूर केलेली नवीन नावे लिहावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याची गंभीर दखल घेत मंत्री यांनी 'ही नावे बदललीच पाहिजेत, यामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे,' असे त्यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आदेश देऊन आजच कारवाई करण्यासाठी सांगतो, असे आश्वासनही त्यांनी दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे. अशाच प्रकारचे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही दिले आहेत. राज्य शासनाने रीतसर शासन निर्णय व राजपत्र प्रसिद्ध करून या नवीन नावांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. एकदा राजपत्र काढून नावात बदल केल्यानंतर सर्व शासकीय दप्तरी आणि सार्वजनिक फलकांवर नवीन नावांचा वापर करणे प्रशासनाला कायदेशीररित्या बंधनकारक असते. असे असतानाही जुन्या नावांचे फलक तसेच ठेवणे, हा अधिकृत शासकीय निर्णयाचा एक प्रकारे प्रशासकीय अवमान आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीनुसार दिशादर्शक फलक अद्ययावत नसणे ही प्रवाशांची दिशाभूल असून, राजपत्रित आदेशाचे पालन न करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची थेट 'कर्तव्यकसुरी' ठरते, असे समितीने निवेदनात सडेतोडपणे स्पष्ट केले आहे. दिशादर्शक फलकांवरील नावांचा हा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी जुने फलक हटवून नवीन नावे अद्ययावत करण्याबाबत तात्काळ 'परिपत्रक' काढावे, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे. या वेळी निवेदन देताना समितीचे मुंबई येथील सतीश सोनार आणि रवींद्र नलावडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्यभारतील महामार्गांवरील फलकांवरून 'औरंगाबाद', 'अहमदनगर' सारखी परकीय नावे हटवून 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर' लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश!हिंदु जनजागृती समितीकडून
July, 04 2026
*नंदुरबार सहकार भारतीतर्फे सहकार दिन साजरा*
July, 04 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये JEE, NEET स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
July, 04 2026
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
July, 04 2026
*कोकण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची किल्ला हरिश्चंद्र गड चढाई मोहीम यशस्वीरित्या संपन्न*
July, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज