*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
*ओझरे गावातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थ संकटात*
ओझरेबुद्रुक(प्रतिनिधी):-संगमेश्वर तालुक्यातील
ओझरे गावातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि पाण्याचे साचलेले डबके निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनांची वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरून साखरपा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर अत्यावश्यक सेवा वेळेत गावात पोहोचणेही कठीण झाले आहे. भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या गंभीर समस्येची छायाचित्रे व व्हिडिओ मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांकडे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शासन व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अर्धवट रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणा व प्रशासनाची राहील, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.



