*अंबिका कॉलनीत गरजू विद्यार्थ्यांना सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्यावतीने खाऊ वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंबिका कॉलनीत गरजू विद्यार्थ्यांना सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्यावतीने खाऊ वाटप*
*अंबिका कॉलनीत गरजू विद्यार्थ्यांना सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्यावतीने खाऊ वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने अंबिका कॉलनी, नंदुरबार येथे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत खाऊ वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक पंकज नामदेव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमात एकूण 15 गरजू लाभार्थी मुलांनी लाभ घेतला. मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी ट्रस्टच्या समाजसेवेच्या कार्याचे कौतुक केले. सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे समाजातील गरजू घटकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, अन्नदान, खाऊ वाटप, साडी वाटप तसेच विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम विनामूल्य राबविले जातात. ट्रस्टचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. याउपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवत ट्रस्टच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांना सर्वांचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



