*पिंपर्डे ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा माफीनामा, निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा दिला होता बिरसा फायटर्सने इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पिंपर्डे ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा माफीनामा, निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा दिला होता बिरसा फायटर्सने इशारा*
*पिंपर्डे ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा माफीनामा, निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा दिला होता बिरसा फायटर्सने इशारा*
शहादा(प्रतिनिधी):-गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणा-या, आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणा-या, गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणा-या व श्री.दिनेश वाघ शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या श्रीमती दिपाली अरविंद उगलमुगले, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पिंपर्डे शहादा जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले होते, तु समोर भेट फक्त आता दाखवते तुला! तू विचार करून ठेव आता! असा धमकीचा मेसेज शिपाई दिनेश वाघ यांना ग्रामसेविका दिपिका उगलमुगले यांनी वाटसपवर पाठविला होता. ग्रामसेविका ह्या गेल्या 3 महिन्यांपासून पिंपर्डे ग्रामपंचायतला आल्या नाहीत. गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून व धमकी दमदाटी करून गैरवर्तन करत आहेत.असा गंभीर आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केला होता. त्यानंतर ग्रामस्थ व बिरसा फायटर्स आक्रमक झाले होते व ग्रामसेविकाच्या निलंबनाची मागणी केली होती. मी दिपाली अरविंद उगलमुगले ग्रामपंचायत पिंपर्डे ग्रामविकास अधिकारी मी असे लिहून देते की, ग्रामपंचायत कर्मचारी (शिपाई) यांना माझ्या कडून वाटसप ग्रूपवर अपशब्द, बदनामी, काही अपमानित शब्द वापरलेत. या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ पिंपर्डे व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या समोर झालेल्या विषयावर दिनेश लोटन वाघ ग्रामपंचायत शिपाई यांच्या कडून लेखी स्वरूपात मी दिपाली अरविंद उगलमुगले ग्रामविकास अधिकारी जाहीर माफी मागते. यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची मी दक्षता घेते, असे आश्वासन देते. अशा स्वरूपाचा लेखी माफीनामा दिपाली उगलमुगले ग्रामविकास अधिकारी यांनी तक्रारदार दिनेश लोटन वाघ यांना सर्वांसमोर दिला आहे.



