*9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी "शाळा बंद" आंदोलनात सहभागी होण्याचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना(प्राथमिक) शाखा नंदुरबारच्या वतीने आवाहन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी "शाळा बंद" आंदोलनात सहभागी होण्याचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना(प्राथमिक) शाखा नंदुरबारच्या वतीने आवाहन
*9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी "शाळा बंद" आंदोलनात सहभागी होण्याचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना(प्राथमिक) शाखा नंदुरबारच्या वतीने आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, नंदुरबार जिल्ह्यांतर्गत सर्व समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी "शाळा बंद" आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यरत शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती संघटना शाखा नंदुरबार यांच्या वतीने करण्यात येत आहे. संघटनांच्या मते, "माझी शाळा जिवंत राहिली पाहिजे, माझ्या तळा -गाळातील वाडी वस्तीवरील व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले पाहिजे आणि शिक्षकांची असुरक्षितात कमी झाली पाहिजे" या भावनेतून हा लढा उभारण्यात आला आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षकांनीच एकत्र येऊन लढा उभारणे ही काळाची गरज असल्याचे सर्व संघटनांनी स्पष्ट केले आहे. सध्या शासनाकडून कार्यरत शिक्षकांबाबत घेतले जाणारे अनेक निर्णय हे जाचक व त्रासदायक ठरत असून त्यामुळे शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येत आहे. विविध शिक्षक संघटनांनी लोकशाही मार्गाने वेळोवेळी शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या; मात्र त्याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. उलट अन्यायकारक निर्णयांमुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे संघटनांनी नमूद केले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –2010 पूर्वी नियुक्त कार्यरत शिक्षकांवरील टीईटी (TET) अनिवार्यता रद्द करणे, पदोन्नतीत सेवाजेष्ठ शिक्षकांवर होणारा अन्यायकारक दूर करणे,
संचमान्यते संदर्भातील त्रुटी व अन्यायकारक निकष दूर करणे.
शिक्षकांकडून BLO व इतर अशैक्षणिक कामांचा भार कमी करून ती कामे शिक्षकांकडून काढून घेणे. या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 9 जुलै 2026 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कार्यरत शिक्षक बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, नंदुरबार व जिल्ह्यांतर्गत सर्व समविचारी शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, नंदुरबार.



