*पोलीस दलातील जुन्या साहित्याचा जाहीर लिलाव तांत्रिक कारणास्तव रद्द-अश्विनी सानप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पोलीस दलातील जुन्या साहित्याचा जाहीर लिलाव तांत्रिक कारणास्तव रद्द-अश्विनी सानप*
*पोलीस दलातील जुन्या साहित्याचा जाहीर लिलाव तांत्रिक कारणास्तव रद्द-अश्विनी सानप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध कार्यालयांमध्ये जमा झालेल्या जुन्या व जीर्ण साहित्याचा आज होणारा जाहीर लिलाव तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालय, विविध पोलीस ठाणे तसेच इतर उपकार्यालयां कडील जुने व जीर्ण झालेले संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, लोखंडी कपाट, पत्रे, खुर्च्या, टेबल आणि इतर भंगार साहित्याचा जाहीर लिलाव आज, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे ही लिलाव प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली आहे. या लिलावाच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन तारीख निश्चित करून फेरप्रसिद्धी दिली जाईल, याची सर्व संबंधित नागरिक आणि इच्छुकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



