*देवरे विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न*
*देवरे विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान गटासाठी 'हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक' तर मोठ्या गटासाठी 'आधुनिक शेती उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा' या विषयावर वकृत्व स्पर्धांचे आयोजित करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला माजी सरपंच केशव वामन पाटील, से.नि.लिपिक रवींद्र मोतीराम पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, यांनी माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यावरण संवर्धन काळाची गरज विषयाला अनुसरून सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. लहान गटातून मित्तल कोळी, द्वितीय आरोही मराठे तर तृतीय क्रमांक गौरव मराठे यांनी पटकावला. मोठ्या गटातून भावेश पानपाटील याने प्रथम, द्वितीय कार्तिका साळुंके तर दीपेश लोहार याने तृतीय क्रमांक संपादन केला. यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर.आर.बागुल यांनी महाराष्ट्र कृषी दिनाची पार्श्वभूमीसह वकृत्व स्पर्धेचे नियम-अटी सांगितल्या. स्पर्धेचे परीक्षण डी.बी.भारती,एम.डी. नेरकर, वाय. डी. बागुल, ए. एस. बेडसे, तर बेलकीपर म्हणून एस. जी.पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन एस. एच. गायकवाड तर आभार एम. एस. मराठे यांनी मानले.



