*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे एक दिवसीय माती परीक्षण कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील माती व जल परीक्षण विभागाचे उमेश पाटील, इको क्लब प्रमुख निलेश गावित, दिनेश वाडेकर, प्रशांत पाटील, भूषण मराठे शशिकांत हजारी हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उमेश पाटील यांनी मातीचा जपून वापर करावा, पिकांसाठी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा, रासायनिक खतांमुळे होणारे जमिनीचे नुकसान विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे यांनी मातीचे विविध प्रकार व माती परीक्षणामुळे होणारे पिकांना फायदे समजून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावित प्रस्ताविक दिनेश वाडेकर नितेश ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



