*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
राजापूर(प्रतिनिधी):-काही ठिकाणे फक्त पर्यटनस्थळ नसतात ती आपल्या गावाची ओळख आपल्या मातीच सौंदर्य आणि आपल्या आठवणींचा एक भाग असतात चुनाकोळवण गावातील सवतकडा धबधबा हे असच एक निसर्गाने आपल्याला दिलेले सुंदर अस वरदान आहे पावसाळ्यात सवतकडा धबधब्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक भेट देत असतात या पर्यटकांना अधिक सुरक्षितपणे धबधब्यापर्यंत जाता यावे आणि परिसर अधिक सुरक्षित रहावा आणि येणाऱ्या पर्यटकांची कसली गैरसोय होऊ नये म्हणून दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये धबधब्याकडे उतरण्यासाठी बांबूचे रेलिंग करण्यात आले तसेच सवतकडा धबधब्या पर्यंत जाणारी पायवाटेची साफसफाई करून ती अधिक रुंद करण्यात आली. जेणेकरून पर्यटकांना धबधब्यापर्यंत सुरक्षितपणे आणि सहजपणे पोचून त्यांना निसर्गरम्य धबधब्याचा आनंद घेता येईल, या उपक्रमात मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचे मुंबई/ ग्रामीण पातळीवरील कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामध्ये प्रामुख्याने धनु कांबले, लक्ष्मण मटकर, शिवराम सोयने,संजय मटकर जगदीश पळसमकर, सुरज पळसमकर, नानबाबू मटकर, प्रवीण मटकर,यश मटकर सहभागी झाले आपल्या गावाविषयीचे प्रेम निसर्ग बद्दलची जाणीव आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवून अंबिकेश्वर प्रतिष्ठानने निसर्ग आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवावा हा संदेश देऊन उपक्रम पूर्ण केला.



