ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

  • Share:

*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
दापोली(प्रतिनिधी):-तालुक्यातील उन्हवरे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने जागृती मित्र मंडळ, जागृती वाडी, उन्हवरे यांच्या वतीने शनिवार, 20 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता उन्हवरे ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वितरणाचा भव्य दिव्य उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंडळाचे मुंबई अध्यक्ष पांडुरंग लोंढे तसेच ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा पानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये उन्हवरे, वावघर, फरारे, देगाव आणि गोविंदशेत पांगारी येथील सर्व दहा शाळांमधील विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील बालकांना मोफत वह्या, छत्र्या आणि  शैक्षणिक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यंदा सलग दहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत वह्या वाटप उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी मंडळ सातत्याने करत असलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रसाळ यांनी भूषविले. यावेळी विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक हिले, जि.प. शाळा उन्हवरे क्र. 1 च्या मुख्याध्यापिका सौ. टोंगारे, राठोड, उन्हवरे क्र. 2 चे मुख्याध्यापक सुहास भागवत, सचिन दांगडे, वावघर क्र. 1 चे मदन बनसोडे व महेश व्यवहारे, वावघर क्र. 2 चे मुख्याध्यापक आनंद रोहे व श्रीमती वानखेडे, गोविंदशेत पांगारीचे मुख्याध्यापक सहाणे, फरारे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक साबीर व श्रीमती शगुप्ता, उन्हवरे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक खातीब, देगाव शाळेचे मुख्याध्यापक गुहागरकर व सौ. मानसी राळे तसेच विविध शाळांतील शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलंबडे, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्राची पवार, शिवसेना विभागप्रमुख  मोहन भागणे, उपसरपंच महेश जावळे, पोलिस पाटील शैलेश लोंढे,तानाजी म्हादलेकर, मुक्तार पठाण,उस्मान खोत, ग्रामपंचायत सदस्य नागेश पानकर, रविंद्र तांबे,विशाल जावळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सदर कार्यक्रमाला मुंबईहून नंदकिशोर खापरे, यतिन पानकर, विजय निकम, जागृती महिला मंडळ अध्यक्षा प्राची लोंढे,तन्वी पानकर, जयश्री शिगवण, काजल  निकम , तुषार शिगवण व पांडुरंग लोंढे तसेच पुण्याहून रमेश पानकर, जगन्नाथ पानकर, कानोजी रेवाळे, रमेश रेवाळे उपस्थित होते. जागृती महिला मंडळ अध्यक्षा शोभा पानकर, व  जागृती महिला मंडळ सदस्य महामाई मंदिर अध्यक्ष शशिकांत पानकर, मोहन पानकर ,दत्ताराम चिनकटे, सचिव लखन कानसरे, उपाध्यक्ष प्रविण कानसरे, रघुनाथ चिनकटे, दत्ताराम शिगवण,चंद्रकांत पानकर, संतोष नाचरे,तुकाराम चिनकटे, प्रभाकर पानकर, माजी विद्यार्थी ऋषीकेश पानकर, अनिकेत रामाणे,नितीन चिनकटे तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नंदकिशोर खापरे व यतिन पानकर यांनी केले. ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान या विचाराला मूर्त स्वरूप देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.विद्येचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साधनांच्या अभावामुळे मागे राहू नये. या उदात्त ध्येयाने जागृती मित्र मंडळाचा हा सामाजिक उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न*
July, 01 2026
*यशवंत विद्यालय, धामणंद,खेड येथे 400 वे निःशुल्क शासकीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पूर्ण*
July, 01 2026
*जागृती मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
July, 01 2026
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
July, 01 2026
*चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानने केली सवतकडा धबधबा परिसराची स्वच्छता*
July, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज