*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
*गोरेगाव मधील महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह सभागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण*
गोरेगाव(प्रतिनिधी):-नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालय, गोरेगाव येथे खासदार निधीतून साकारलेल्या अत्याधुनिक कलागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या तसेच शाळेच्या संपूर्ण इमारतीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्थेचे भव्य उद्घाटन सोमवार, 29 जून 2026 रोजी माजी राज्यसभा खासदार सौ. प्रियांका चतुर्वेदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याचप्रसंगी महाराष्ट्र विद्यालयाच्या मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या विद्यार्थी दिनदर्शिकेचे (Student Calendar) प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका सौ. लक्ष्मी भाटिया- फाळके, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्यक्षा सौ. गौरी सावंत, रोटरी क्लबचे सचिव दर्शन शाह, उपाध्यक्ष सखाराम गिराप, रवी सैनी (संचालक – Witmans Industries Pvt. Ltd.), रोटेरियन अनिल सिंघी (संचालक – Addon Holding Pvt. Ltd.), रझवान नाईक (वेदांत फाउंडेशन), रोटेरियन राजेश अग्रवाल (Rotary Club of Bombay Airport) तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, "आज आपण केवळ दोन दालनांचे उद्घाटन करत नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नवी दारे उघडत आहोत." त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार यांच्या निधीतून विद्यालयातील कलागृह सभागृह व कॉम्प्युटर लॅबचे नूतनीकरण करण्यात आले असून, कलागृह सभागृह विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, तर अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सक्षमपणे जोडेल. कोडिंग, डिझाइनिंग, प्रेझेंटेशन यांसारख्या आधुनिक कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ परीक्षांसाठी नव्हे, तर भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठीही तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक मतदार संघ आमदार व कार्यकारिणी सदस्य, मार्गदर्शक ज. मो. अभ्यंकर यांच्या आमदार निधीतून एक डिजिटल स्मार्ट संगणक देण्यात आला. तसेच महाराष्ट्र विद्यालयाच्या मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या विद्यार्थी दिनदर्शिकेचे प्रकाशनही सौ. प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
याच कार्यक्रमात NSDC मान्यताप्राप्त वेदान्त व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रामचाही शुभारंभ करण्यात आला. वेदान्त फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना CCTV, मोबाईल रिपेअरिंग, ब्युटी, आयटी आदी रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक प्रमाणपत्राबरोबरच रोजगारक्षम कौशल्यही असेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
सौ. प्रियांका चतुर्वेदी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, देणगीदार, रोटरी क्लब, वेदान्त फाउंडेशन तसेच नूतन विद्यामंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. विशेषतः समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्यक्षा सौ. गौरी सावंत यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना ऊ. बा. ठा पक्षाच्या माजी राज्यसभा खासदार सौ. प्रियांका चतुर्वेदी, नगरसेविका सौ. लक्ष्मी भाटिया- फाळके, अमित जोशी, अजित पितळे,अध्यक्ष विवेक वैद्य, रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टच्या अध्यक्षा सौ. गौरी सावंत, रोटरी क्लबचे सचिव दर्शन शाह, उपाध्यक्ष सखाराम गिराप, रवी सैनी, रोटेरियन अनिल सिंघी, रझवान नाईक, रोटेरियन राजेश अग्रवाल तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी, वेदान्त फाउंडेशनचे प्रतिनिधी, नूतन विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव अनिल देसाई, संचालक शंकर पटनाईक, संजय काळभोर, महेश करमरकर, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. प्रतिभा तरपटला, संस्थेचे सल्लागार मुरलीधर मोरे, एन. व्ही. एम.'स महाराष्ट्र इंग्लिश School च्या प्राचार्या सौ. पूर्वा नाईक, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू मसुरकर, तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध मान्यवर, देणगीदार संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रभावी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव अनिल देसाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.



