*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थी परिषद गठीत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थी परिषद गठीत*
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थी परिषद गठीत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कुल मध्ये लोकशाही पध्दतीने 27 जुन रोजी मतदान घेण्यात आले, यात इ. 6 वी ते 12 पर्यतच्या विद्यार्थीनी मतदान केले. या मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्कूल लिडर (बॉय), स्कुल लिडर (गर्ल), हेड गर्ल आणि हेड बॉय साठी निवडणुक घेण्यात आली या मध्ये जवळपास सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात स्कूल लिडर – (बॉय) या पदासाठी 726 मतांमधून 523 एवढे मत प्राप्त करुन कुमार रुपार्थ भावसार स्कूल लिडर (बॉय) म्हणुन निवडुन आला. तर कुमारी अनुष्का पाटील विनाविरोध निवडुन आली. तर हेड बॉय या पदासाठी प्रशांत वळवी याला 147 ऐवढया मतांनी निवडुन आला व हेड गर्ल या पदासाठी कुमारी धानी जैन हिने 726 मतांमधुन 301 मत प्राप्त करुन हेड गर्ल पदावर निवडुन आली. संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संचालक सिध्दार्थ वाणी, प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन करत भावीकाळासाठी शुभेच्छा दिल्या.



