*1 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*1 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
*1 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रशासकीय, विकासात्मक व जनहिताच्या विषयांबाबत तसेच निवेदने व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट अधिक सुलभ व नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार 1 जुलै 2026 पासून प्रत्येक मंगळवार व गुरुवारी दुपारी 1 ते 2 या वेळेत नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येणार आहे. यापूर्वी नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट बुधवार व शुक्रवार या दिवशी दुपारी 1 ते 2 या वेळेत निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यालयीन कामकाजाचे प्रभावी नियोजन, विविध बैठका, क्षेत्रीय दौरे, लोकाभिमुख उपक्रम तसेच प्रशासकीय कामकाजातील सुसूत्रता लक्षात घेऊन या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता मंगळवार व गुरुवार या दिवशी दुपारी 1 ते 2 या वेळेत नागरिकांनी भेटीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बदलाची माहिती देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित बैठका, पत्रव्यवहार व भेटींचे नियोजन करताना या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विशेष व तातडीच्या प्रशासकीय बाबींमध्ये आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने अथवा संबंधित शाखेमार्फत स्वतंत्र वेळ निश्चित करून भेटीचे नियोजन करता येईल. सदर सुधारित वेळापत्रक 1 जुलै 2026 पासून लागू होणार असून, यापूर्वी या विषयासंदर्भात जारी करण्यात आलेले सर्व आदेश व सूचना रद्द समजण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.



