*विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास, खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास, खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
*विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास, खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
नंदुरबार(शैलेंद्र चौधरी):-राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या माजी खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित यांचा वाढदिवस म्हणजे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी प्रेरणेचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांना दिल्लीच्या संसदेत ठामपणे मांडत विकासालाच राजकारणाचा केंद्रबिंदू बनविणाऱ्या डॉ. हिना गावित यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. तसेच खानदेशातून संसदेत पोहोचलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार म्हणून त्यांनी इतिहास रचला. अवघ्या काही वर्षांत संसदीय कामगिरीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. सलग सात वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी संसदीय कार्याची देशभर दखल घेण्यात आली.
नंदुरबारसारख्या दुर्गम आदिवासी भागातील प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. संसदेत कुपोषण, सिकलसेल, स्थलांतर, आरोग्य, रस्ते, रेल्वे, सिंचन, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला खासदार म्हणूनही त्यांनी मानाचा बहुमान मिळविला.
त्यांच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळाली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, गाव रस्ते, मोठे पूल, रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, रेल्वे दुहेरीकरण, नवीन प्लॅटफॉर्म, लिफ्ट, भुयारी मार्ग, दिव्यांगांसाठी सुविधा, वाहनतळ आणि रेल्वे गाड्यांना नवीन थांबे मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. उज्ज्वला योजनेद्वारे हजारो महिलांना धुरमुक्त स्वयंपाकघर मिळाले. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले. कौशल्य विकास योजनांमधून युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध झाले. महिला बचत गटांना उद्योग, शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि विविध स्वयंरोजगार योजनांशी जोडून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल घडवून आणली. आदिवासी भागातील हंगामी स्थलांतर कमी करण्यासाठी त्यांनी रोजगार निर्मितीवर भर दिला. शेतीपूरक व्यवसाय, फळबाग, ठिबक सिंचन, बोकड- शेळीपालन, नाबार्डच्या योजना, संयुक्त दायित्व गट आणि विविध स्वयंरोजगार उपक्रमांद्वारे हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
आरोग्य क्षेत्रातही त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय राहिले. नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, आयुष रुग्णालय, माता- बाल रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कर्मचारी निवासस्थाने, सिकलसेल तपासणी केंद्रे आणि आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कुपोषण आणि सिकलसेलविरोधातील लढ्याला त्यांनी विकासाचा महत्त्वाचा भाग बनविले. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यासाठी क्रिटिकल केअर हॉस्पिटल, सैनिक शाळा, केंद्रीय विद्यालय, पासपोर्ट कार्यालय, प्लास्टिक इंजिनिअरिंग महाविद्यालय, टेक्सटाईल पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित झाले आणि अनेक कामांना गती मिळाली. ही विकासदृष्टीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख ठरली. डॉ. हिना गावित यांच्या यशामागे महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी उभा केलेला विकासाचा मजबूत पाया आणि त्यातून मिळालेली जनसेवेची प्रेरणा महत्त्वाची ठरली. त्या परंपरेला पुढे नेत त्यांनी नंदुरबारच्या विकासाला राष्ट्रीय स्तरावरील दिशा दिली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पदाचा वापर केवळ राजकारणासाठी नव्हे, तर विकासासाठी केला. जनतेशी असलेली नाळ, अभ्यासपूर्ण नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याची तळमळ यामुळे त्या आजही हजारो युवक- युवतींसाठी प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. समाजसेवा आणि विकासाची त्यांची वाटचाल अशीच अधिक व्यापक होत राहो, हीच सदिच्छा.



