*अक्कलकुवा ते मोलगी सार्वजनिक रस्त्यावर ईटवाई बसस्थानक जवळ स्पोटर्स मोटार सायकलवर धोकादायक स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ प्रसारित, व्हिडीओची गंभीर दखल घेत त्याच्याविरुध्द अक्कलकुवा पोली
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा ते मोलगी सार्वजनिक रस्त्यावर ईटवाई बसस्थानक जवळ स्पोटर्स मोटार सायकलवर धोकादायक स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ प्रसारित, व्हिडीओची गंभीर दखल घेत त्याच्याविरुध्द अक्कलकुवा पोली
*अक्कलकुवा ते मोलगी सार्वजनिक रस्त्यावर ईटवाई बसस्थानक जवळ स्पोटर्स मोटार सायकलवर धोकादायक स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ प्रसारित, व्हिडीओची गंभीर दखल घेत त्याच्याविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 26 जुन 2026 रोजी एक अज्ञात मोटार सायकल स्वार हा अक्कलकुवा ते मोलगी सार्वजनिक रस्त्यावर ईटवाई बसस्थानक जवळ त्याचे स्पोटर्स मोटार सायकलवर धोकादायक स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ न्युज चॅनलवर सोशल मिडीयाव्दारे प्रसारित झाला होता. त्या अनुषंगाने सदर व्हिडीओची गंभीर दखल घेवुन वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याचेविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे गुरनं 295/2026 BNS कलम 125, 181 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी व्हिडीओतील वाहन चालकाचा जिल्हयातील सर्व पोलीस पाटील गृपवर शोध घेतला असता तो मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील भगदरीपाडा येथे मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जतिन गंगासिंग पाडवी वय- 22 वर्ष रा. भगदरी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास चौकशी केली असता त्याने सार्वजनिक रस्त्यावर मोटार सायकलवर स्टंटबाजी केल्याची बाब निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुध्द लागु कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. श्रीमती. अश्विनी सानप, पोलीस अधिक्षक नंदुरबार, आशित कांबळे, अपर पोलीस अधिक्षक नंदुरबार, सुभाष भोये, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा, पोलीस निरीक्षक, अर्जुन पटले अक्कलकुवा पोलीस स्टेशन यांनी सर्व युवक व नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे अथवा स्वतःच्या व इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यापुढील काळात धोकादायक पध्दतीने वाहन चालविणारे, अवैध प्रवासी वाहतुक व वाहनांच्या टपावर बसवुन प्रवासी वाहतुक करणारे वाहन चालकांवर विशेष मोहिमव्दारे कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.



