*राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयातर्फे विशेष मोहीमेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयातर्फे विशेष मोहीमेचे आयोजन*
*राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयातर्फे विशेष मोहीमेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून 26 जून 2026 ते 3 जुलै 2026 या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विशेष मोहीमेमध्ये जिल्हयातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विदयार्थ्याना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. इ.11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विदयार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्ष विदयार्थ्याचे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून तसेच त्रुटीयुक्त प्रकरणाबाबत वेबीनारचे आयोजन करून विदयार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच महाविदयालय स्तरावर कार्यरत असणाऱ्या Equal Opportunity Centre च्या माध्यमातुन महाविदयालयातील इ.11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विदयार्थ्याचे अर्ज समितीस पडताळणी करिता प्राप्त होतील याचे देखील नियोजन करण्यात आले आहे, या मोहीमेदरम्यान जास्तीत जास्त विदयार्थ्यानी जात वैधता अर्ज समितीकडे सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व या विशेष मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त श्रीमती वैशाली हिंगे तसेच संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.