*बिलगाव वनक्षेत्रातील माळ परिमंडळातील शेलदा निमखेडी रस्त्यावर, वनविभागाच्या गस्तीपथकाने कारवाई करत 13,145 रुपयाचा सागाचा मुद्देमाल जप्त केला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिलगाव वनक्षेत्रातील माळ परिमंडळातील शेलदा निमखेडी रस्त्यावर, वनविभागाच्या गस्तीपथकाने कारवाई करत 13,145 रुपयाचा सागाचा मुद्देमाल जप्त केला*
*बिलगाव वनक्षेत्रातील माळ परिमंडळातील शेलदा निमखेडी रस्त्यावर, वनविभागाच्या गस्तीपथकाने कारवाई करत 13,145 रुपयाचा सागाचा मुद्देमाल जप्त केला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वनविभागाच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरूंन नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातील माळ परिमंडळातील, माळ नियतक्षेत्रातील मौजे शेलदा -निमखेडी रस्त्यावर बिलगाव वनविभागाचे पथक रात्रीची गस्त घालत असताना, पिक अप वाहन क्रमांक एम एच 04 एबी 4655 मध्ये बिनापासी अवैधरित्या साग बेलखे-17 नग 0.325 घनमीटर माल, 7231 रूपये किमतीचा व साग दांडी नग-3 0.116 घणमीटर माल, 2538 रुपये किमतीचा व साग जळाऊ थप्पी 1.80 घ.मी. माल 3376 किमतीचा असा एकुण 13145 रुपये किमतीचा मुद्देमाल वाहतूक करताना मिळून आला, सदर वाहनात वरील भागात जळाऊ लाकूड व खालील भागात साग बेलखे या पध्दतीने मुद्देमाल आढळून आला असून, वाहन चालकास वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक थांबला नाही, वनकर्मचाऱ्यांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक व वनपाल, वनरक्षक यांनी जीवाची पर्वा न करता सुमारे दोन तास पाठलाग करुन, पंधरा ते वीस किलोमीटरवर सदर वाहन पानबारी गावाजवळ पकडले, वाहन चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शोध घेतला असता मिळून आला नाही. सदर वाहन व मुद्देमाल जप्त करुन धडगाव टिंबर डेपोमध्ये ताबा पावतीने जमा केला. याबाबत वनरक्षक माळ मंगेश वळवी यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41अ, 41ब चे उल्लंघन, व भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 52 -1 अन्वये वनगुन्हा नोंदविला असून, सदरची कारवाई वनसंरक्षक प्रा. धुळे श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक नंदुरबार संतोष सस्ते, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक रो.ह. यो. अक्राणी संजय साळुंके, व
सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल बिलगाव विजय फणसे, वनपाल भूषा भरतसिंग परदेशी, वनरक्षक माळ मंगेश वळवी, वनरक्षक दिनेश वसावे, वाहन चालक हेमंत पावरा यांनी सहभाग घेतला. पुढील तपास वनपाल माळ श्रीमती प्रियांका निकुंभे या करित आहेत.



