*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांची ग्रॅच्युटीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, अखेर न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांची ग्रॅच्युटीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, अखेर न
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांची ग्रॅच्युटीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, अखेर न्यायालयीन लढ्याला यश सेविका मदतनिसांमध्ये आनंदाचे वातावरण, कर्मचाऱ्यांनी मानले युनियनचे आभार, राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवून देण्यासाठी आंदोलन उभारू समन्वय समितीचा निर्धार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस आणि निधन झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या वारसांनी ग्रॅच्युटी कायद्यानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळावी म्हणून सन 2022 मध्ये टप्पा टप्प्याने कोर्टात दावे (केस) दाखल केले होते.
सदर दाव्यांचे (केसचे) कोर्टासमोर कामकाज चालून केसेस दाखल केलेल्या सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 नुसार कामगार न्यायालयाने ग्रॅच्युटीची रक्कम तात्काळ देण्याबाबत धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद यांना आदेश दिले होते. सदर आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्हा परिषदांनी औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु औद्योगिक न्यायालयाने कामगार न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सदर अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याबाबत आदेशित केले.
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही जिल्हा परिषदांनी शासन स्तरावरील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत पहिल्या टप्प्यातील दावे (केसेस) दाखल केलेल्या सेविका व मदतनिसांना प्रत्येकी सुमारे 60 हजारांपासून ते तिन लाखापर्यंत ग्रॅच्युटीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस तसेच मृतांच्या वारसांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या आपल्या युनियनला खंबीरपणे साथ देऊन खोटे नाटे मेसेज पाठवून आमची आणि समन्वय समितीची बदनामी करणाऱ्यांना कोणीतीही भिक घालू नये असे युवराज बैसाने, रामकृष्ण बी. पाटील, संजय मापले जयश्री वाबळे, राजू पाटील, अमोल बैसाने, वकील पाटील यांनी कळविले आहे.



