*महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचा गुटखा तथा सुंगधी तंम्बाखु व 30 लाख रुपयेकिंमतीचा कंटेनर जप्त,नवापुर पोलीसांची कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचा गुटखा तथा सुंगधी तंम्बाखु व 30 लाख रुपयेकिंमतीचा कंटेनर जप्त,नवापुर पोलीसांची कारवाई*
*महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचा गुटखा तथा सुंगधी तंम्बाखु व 30 लाख रुपयेकिंमतीचा कंटेनर जप्त,नवापुर पोलीसांची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-26 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती प्राप्त झाली की, सुरत कडुन विजयवाडा, राज्य आंध्रप्रदेश कडे जाणाऱ्या एका ट्रक मधुन विविध साहित्याचे पार्सल सोबत सुगंधी तंम्बाखु व गुटख्याची वाहतुक केली जात आहे प्राप्त झालेल्या महितीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, नंदुरबार उपविभाग, नंदुरबार यांच्याकडुन मार्गदर्शन घेवुन नवापुर येथील कुणाल हॉटेलच्या जवळ रोडवर नाकाबंदी लावण्यात आली असता रात्री 2 वाजेच्या सुमारास गुप्त माहिती नुसार कंटेनर क्रमांक कंटेनर क्रमांक RJ 19 GK 1963 थांबवुन तिची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये विविध साहित्याचे पार्सल सोबत सुगंधी तंम्बाखु तथा गुटखा मिळुन आला, 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे मेजबान जाफरानी जर्दा (MEZBAN ZAFRANI ZARDA) तंबाकुचे (मोठे पॅकेट) प्रत्येकी 440/- किंमतीचे एकुण 500 नग पॅकेट,
3 लाख रुपये किंमतीचे सुगंधित तंबाकुचे एकुण 30 नग गोल्डन रंगाचे मोठे पॅकेट, प्रत्येकी पॅकेट अंदाजे वजन 10 कि.ग्रॅ. प्रमाणे, प्रत्येकी 1 किलो सुंगधी तंबाकुची किंमत 1,000 रुपये प्रमाणे, पाकीटावर कुठलेही लेबल नाही असे किंमत अंदाजे. 30 लाख रुपये किंमतीचा एक अशोक लेलँड कंपनीची कंटेनर क्रमांक RJ 19 GK 1963 जु.वा.किं.अ. 35 लाख 20 हजार रुपये एकुण किंमतिचा मुद्देमाल मिळुन आल्याने तात्काळ नंदुरबार येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करण्यात आला. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डौले हे नवापुर पोलीस ठाणे येथे हजर झाले. त्यांनी मालाची तपासणी करुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधी तंम्बाखु असल्याचे त्यांनी खात्री करुन कळविले. त्यावरुन त्यांनी नवापुर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादी वरुन नवापुर पोलीस ठाणे गु.र.नं. 555 / 2026 अन्न सुरक्षा व मानके कायदा सन 2006 चे कलम 26 (2) (i) सहवाचन कलम 3 (i) (zz) सहवाचन कलम 27 (3) (e), तसेच 26 (2)(iv), सहवाचन कलम 30 (2) (अ), तसेच कलम 27 (3) (d) अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दिनांक 16 जुलै 2025 रोजीच्या शासन राजपत्र आदेशचे उल्लंघन केल्याने शिक्षा कलम 59 (1) अन्वये तसेच भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम 123, 223, 275, 274 अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात कंटेनर चालक कायमदीन खान सुलतानखान वय 22 वर्षे, धंदा ड्रायव्हर, राहणार श्यामपुरा, ता. गिरा, जि. बारमेर, राज्य राजस्थान यांस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे हे करीत आहेत. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे, पोलीस हवालदार दिनेशकुमार वसुले, पो.ह. / 144 किशोर वळवी, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, अतुल पानपाटील, समाधान केंद्रे, संजय गावीत, यांच्या पथकाने केली आहे.



