*रक्षा खडसे केंद्रीय मंत्री यांना धुळे व नंदुरबार जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजनांचे प्रतिनिधी, जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते, परंतु अजूनही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे, त्यांना पुन्हा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रक्षा खडसे केंद्रीय मंत्री यांना धुळे व नंदुरबार जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजनांचे प्रतिनिधी, जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते, परंतु अजूनही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे, त्यांना पुन्हा
*रक्षा खडसे केंद्रीय मंत्री यांना धुळे व नंदुरबार जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजनांचे प्रतिनिधी, जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते, परंतु अजूनही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे, त्यांना पुन्हा जलसमाधी घेण्याचा निर्णयावर भाग पाडीत असल्याबाबत, चेअरमन व प्रतिनिधी चर्चेबाबत निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार व धुळे जिल्हा पाणी पुरवठा संस्थांचा संघ मर्या. यांच्यातर्फे
श्रीमती.रक्षा खडसे केंद्रीय क्रीडा मंत्री भारत सरकार यांना
धुळे व नंदुरबार जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजनांचे प्रतिनिधी जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते, परंतु अजूनही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे त्यांना पुन्हा जलसमाधी घेण्याचा निर्णयावर भाग पाडीत असल्याबाबत 30 ऑक्टोंबर 2025 रोजी झालेल्या चेअरमन व प्रतिनिधी चर्चेबाबत निवेदन देण्यात आले.
30 ऑक्टोंबर 2025 रोजी 22 उपसा जलसिंचन योजनांचे चेअरमन व प्रतिनिधी यांची सभा संपन्न झाली, त्यात प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली. धुळे व नंदुरबार जिल्हयातील 22 उपसा जलसिंचन योजना बंद अवस्थेत होत्या. मात्र शासनाने सर्व योजनांचे पुनर्जीवन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र शासनाच्या इलेक्ट्रीकल, स्थापत्य व अभियांत्रिकी या विभागांकडून कामाची दिरंगाई होत आहे. प्रत्येक विभागात योग्य पद्धतीने जो समन्वयक असावा, तसा समन्वयक नसल्यामुळे कामे संथगतीने सुरू आहे. म्हणून 22 उपसा जलसिंचन योजनांचे प्रतिनिधी यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचे योजिले होते. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच संजय म. बेलसरे सचिव, लाभक्षेत्र विभाग / प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मध्यस्थीने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु सद्यः स्थितीत कार्यारंभ आदेशात नमूद केल्यानुसार एका वर्षाच्या कालावधीत एकही योजनेचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होत आहे. त्यामुळे सदर स्थगित आंदोलन पुनःश्च कार्यान्वित करावे का ? या मनःस्थितीत शेतकरी आहेत. त्यामुळे सदरच्या कामांना गती न मिळाल्यास व संबंधित विभागाकडून संबंधित कंत्राटदारांना याबाबत वेळेची मर्यादा संपल्याबाबतचे कोणतीही लेखी सूचना का देण्यात आली नाही, काही कंत्राटदारांनी पाच -पाच, सहा-सहा योजनांचे काम यंत्रणा नसताना ओढून घेतली ही बाब अत्यंत खेदजनक आहे. धड एक योजनेचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नाही तर पाच-सहा योजनांची घेतलेली कामे पुढील 10 वर्षात देखील पूर्ण होणार नाही, याची आम्हांला पूर्ण खात्री झालेली आहे. आणि म्हणून आम्हांस टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे.
शासकिय पाणी वाटप संस्था निर्माण करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई होत आहे.
अनेक योजनांच्या कामात अजूनपर्यंत बरीचशी कामे बाकी आहेत, ती कामे अशा संथगतीने जर सुरू राहिली तर पुढील 10 वर्ष ही कामे होणार नाहीत. प्रत्येक वेळेस कुठले ना कुठले कारण दाखवून मुदतवाढ मागितली जाते ही बाब न पटण्याजोगी आहे. मुदतीत ज्या योजनांची कामे झाली नाहीत, त्या कंत्राटदारांना दैनंदिन दंडात्मक कारवाईचा बडगा दाखविल्याशिवाय कामास वेग येणार नाही आणि तरी देखील काम होणार नाही, अशा कंत्राटदारांचे नाव काळ्या यादीत नोंद करावी अशी देखील चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी आपल्या कार्यालयाकडून योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. योजनांच्या टेंडरमध्ये नमूद केल्याप्रमाणे या वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण कामे होऊन योजना सुरू झाल्या पाहिजेत अशी स्पष्ट अट असून देखील सदर टेंडर 2023 या वर्षी देण्यात आले होते. परंतु 02 वर्ष होऊन सुद्धा सदर कालावधीत काम होणार नाही असे दिसते. म्हणून आपण स्वतः याबाबत सर्व विभागांच्या प्रमुखांना व 22 उपसा जलसिंचन योजनांच्या प्रतिनिधींना बोलावून आढावा घ्यावा, तरच कामाला वेग येईल अशी आमची धारणा झाली आहे. सदर आंदोलन पुनःश्च व्हावेकरिता आम्हांला सदरचे विभाग त्रास देऊन पुन्हा आंदोलनास प्रवृत्त करीत आहे. तरी जर समजा कामाला वेग आला नाहीतर, आम्हांला पुन्हा जलसमाधी शिवाय पर्याय उरणार नाही. असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, आम्हांला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी 22 उपसा जलसिंचन योजनांचे पदाधिकारी यांनी केली आहे. उपसा जलसिंचन योजनांचे नावे विध्यासिनी (अक्कडसे लार्ज) उपसा जलसिंचन योजना, धमाणे, ता. शिंदखेडा, श्री जयभवानी उसियो, निमगुळ, ता. शिंदखेडा,
श्री सिद्धेश्वर उसियो, लहान शहादे, ता. नंदुरबार, श्री दिपकनाथ उसियो, समशेरपूर, ता. नंदुरबार, श्री भद्रेश्वर उसियो, कोरीट, ता. नंदुरबार, श्री राधाकृष्ण उसियो, हाटमोहिदे, ता. नंदुरबार, श्री विश्वतीर्थ उसियो, काकर्दे, ता. नंदुरबार, श्री जनता उसियो, कोपर्ली, ता. नंदुरबार, श्री केदारेश्वर उसियो, प्रकाशा, ता. शहादा, श्री देवकीनंदन उसियो, शिरूड, ता. शहादा, श्री उत्तर तापी तिरे उसियो, बिलाडी, ता. शहादा, श्री रामकृष्ण उसियो, कहाटुळ, ता. शहादा, श्री हरितक्रांती उसियो, पुसनद, ता. शहादा, श्री दत्त उसियो, सारंगखेडा, ता. शहादा, श्री गायत्री उसियो, कळंबू, ता. शहादा, श्री कामेश्वर उसियो, बामखेडा त.त., ता. शहादा, श्री दाऊळ मंदाणे उसियो, दाऊळ, ता. शिंदखेडा, श्री रविकन्या उसियो लोहगाव, ता. शिंदखेडा, श्री भाग्यलक्ष्मी उसियो, लंघाणे, ता. शिंदखेडा, श्री कमलताई पी. पाटील उसियो, विरदेल, ता. शिंदखेडा, श्री आशापुरी तापीमाई उसियो, पाटण, ता. शिंदखेडा, श्री अक्कडसे सोनेवाडी उसियो, नेवाडे, ता. शिंदखेडा.



