*अखेर तिन दिवसांनंतर तिन गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत!*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखेर तिन दिवसांनंतर तिन गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत!*
*अखेर तिन दिवसांनंतर तिन गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत!*
पाचल(प्रतिनिधी):-23 जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसासह वादळी वाऱ्याने लांजा तालुक्यातील अनेक भागांना झोडपून तडाखा दिला. या वादळात कोंडगे गावातील विजेचे खांब मूळासकट तुटल्यामुळे कोंडगे, कुरंग आणि झर्ये या तिन्ही गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे तिन दिवस खंडित झाला होता.
ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावून सामना करावा लागत होता. असे असताना या समस्येची दखल घेत उबाठा पक्षाचे युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला.
महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तारेवरची कसरत करत रात्र दिवस अशा कठीण परिस्थितीत काम करत दुरुस्तीचे काम पूर्ण पणे केले. यावेळी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून संतोष कदम, परशुराम साळुंखे, राजा बेर्डे तसेच इतर ग्रामस्थांनीही वीज कर्मचाऱ्याना मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या मदतीमुळे काम अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत झाली. अखेर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना तब्बल तिन दिवसाने यश मिळाले. आणि अखेर 25 जून रोजी सायंकाळी 7 वाजता तिन्ही गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी परिश्रम घेणारे महावितरण अधिकारी, कर्मचारी, सहकार्य करणारे ग्रामस्थ आणि पाठपुरावा करणारे सचिन बेर्डे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. लोक वर्गातून करण्यात आले. "संकट कितीही मोठं असलं तरी जनतेच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी लोकसेवा आहे." असे सचिन बेर्डे यांनी प्रत्येक वेळी लोकांना पटवून दिले.



