*शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा-बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा-बिरसा फायटर्सची मागणी*
*शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा-बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या सोशल मीडियावरील व्यंगात्मक राजकीय आंदोलनाने जूलै 2026 मध्ये दिल्लीतील जंतर-मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत धरणे आंदोलन करत आहे. नीट (NEET) परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जुलै 2026 रोजी जंतर-मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. देशभरात गाजलेल्या 'नीट पेपर लीक' प्रकरणामुळे आंदोलकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. निदर्शकांनी ताट आणि चमचे वाजवून 'गो प्रधान गो' (Go Pradhan Go) अशी घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनाला पर्यावरणवादी सोनम वांगुच यांच्यासह 'आप', 'उद्धव सेना' आणि 'सीपीआय' (CPI) यांसारख्या राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळाला.तरी आम्ही सुद्धा बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत, देशात एकूण 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात विद्यार्थी वर्गात व जनतेत सरकार बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.



