ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*

  • Share:

*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
मुंबई(प्रतिनिधी):-संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) माजी विद्यार्थ्यांचा गौरव नुकताच एका विशेष सोहळ्यात करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी हा भावूक आणि प्रेरणादायी अभिनंदन सत्कार सोहळा 24 जून 2026 रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या गेल्या 32 वर्षांच्या दैदिप्यमान प्रवासात लातूरचे भूकंपग्रस्त, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तसेच आदिवासी समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजात मानाचे स्थान मिळवत आहेत. याच यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित पद्माकर गोरे लिखित ‘फिनिक्स (यशोगाथा)’ या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. "प्रतिकूल परिस्थितीवर केवळ शिक्षणाच्या आणि जिद्दीच्या बळावर मात कशी करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची बदललेली जीवनगाथा समाजासाठी नेहमीच दीपस्तंभासारखी काम करेल," असा सूर याप्रसंगी उमटला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे (BJS) संस्थापक शांतिलाल मुथ्था, कु. दिविजा फडणवीस, विलास राठोड आणि BJS च्या मैनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या WERC च्या या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. हजारो वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे अवाढव्य सेवाकार्य यशस्वीरीत्या पूर्ण पार पाडण्यात पंडित राठोड आणि संचित यादव यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाचे सहकार्य लाभले. हा सोहळा केवळ सत्कार सोहळा न राहता, संघर्षातून यशाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा एक अभूतपूर्व उत्सव ठरला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झालेल्या तळवडेच्या अनिकेत गोसावीचा युवा सेनेच्यावतीने सत्कार
June, 26 2026
*राजापूर अजिवलीत माळरान व जंगल परिसरात "दारू अड्डा",फुटलेल्या बाटल्यांमुळे ग्रामस्थ,जानावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न*
June, 26 2026
*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव*
June, 26 2026
*नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी*
June, 26 2026
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
June, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज