*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
*मानादास कॅशकाऊ कोळंब येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न*
पाचल(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद शाळा कोळंब तालुका राजापूर येथे माना दास कॅश काऊ फिनसर्व यांचेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या, कंपासपेटी, पाणी बॉटल असे शालेय उपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. गेले तीन वर्ष ही संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्य वितरित करत आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मानाजी धावले, सावंत तसेच कोळंबचे सरपंच शाहू पाटेकर, उपसरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश सुतार तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक देव पाटेकर, मुख्याध्यापक जयेश तेलंग, शिक्षक जयवंत पवार, कु.प्रणाली मोरे आणि पालक आदी मान्यवर उपस्थित होते, या प्रसंगी मार्गदर्शन करताना धावले यांनी ' शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे' या डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण मुलांना करून दिली आणि तुम्ही शिकत राहा शिक्षणात कोणतीही अडचण आली तर आम्ही ती दूर करण्यासाठी सदैव तयार आहोत असे संस्थेच्यावतीने आश्वासित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी प्रणाली मोरे यांनी तर आभार पवार यांनी मानले.
माना दास कॅश काऊच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून कौतुक केले जात आहे.



