*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (नंदुरबार) आणि जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शहरात भव्य 'ऑलिंपिक दौड' (ऑलिंपिक रन) आणि विविध क्रीडा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते ऑलिंपिक दौडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या दौडीची सुरुवात छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर (अंधारे चौक) येथून झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून जात ही दौड हुतात्मा चौक (शहीद शिरीषकुमार चौक) येथे पोहोचली, जिथे दौडीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थितांच्या वतीने शहीद शिरीषकुमार यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समारोप प्रसंगी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींना ऑलिंपिक चळवळीचे महत्त्व, खेळांचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व, तसेच विविध क्रीडा प्रकारांतील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाचा इतिहास आणि उद्देश स्पष्ट करत सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे खेळात सहभागी होण्याचे व तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सादरीकरण ठरले. या विद्यार्थिनींच्या पथकाने सादर केलेल्या उत्कृष्ट योगनृत्य आणि आकर्षक योगप्रात्यक्षिकांनी उपस्थित क्रीडा रसिक, शिक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक डॉ. मयूर ठाकरे व जगदीश बच्छाव यांनी केले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी व कल्पेश बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, विविध शाळा- महाविद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि शेकडो खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



