*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देणे आणि त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत विविध कर्ज व अनुदान योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या नंदुरबार जिल्हा कार्यालयाला विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाजातील गरजू व होतकरू महिला -पुरुषांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) चे जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या 12 पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार लाभ:
महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील 12 पोटजातींमधील व्यक्तींना अर्थसहाय्य केले जाते: यामध्ये मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, व मादिगा. या जातींचा समावेश आहे. योजना आणि जिल्ह्यासाठीचे उद्दिष्ट: चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने नंदुरबार जिल्ह्याकरिता खालीलप्रमाणे उद्दिष्टे निश्चित केली आहेत:
अनुदान कर्ज योजना: प्रकल्प मर्यादा रु. 1 लाखापर्यंत (उद्दिष्ट - 30 लाभार्थी), बीजभांडवल कर्ज योजना: प्रकल्प मर्यादा रु. 1 ते 7 लाखापर्यंत (उद्दिष्ट - 30 लाभार्थी), थेट कर्ज योजना: प्रकल्प मर्यादा रु. 1 लाखापर्यंत (उद्दिष्ट - 20 लाभार्थी), योजनेसाठीच्या प्रमुख अटी व पात्रता: अर्जदार नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जदार मातंग समाजातील वरील 12 पोटजातींपैकी असावा. अर्जदारास निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावा, केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण व शहरी भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने यापूर्वी महामंडळ किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे (कर्ज प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा):
अर्जाचा नमुना व इतर कर्ज फॉर्म महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मोफत / विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे: सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. तहसीलदार यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
दोन पासपोर्ट साईज फोटो.
रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड आणि मोबाईल नंबर. व्यवसायाच्या जागेची उपलब्धता, घराचा उतारा, मालकी हक्काचा पुरावा किंवा करारपत्र. उद्योग आधार / शॉप ॲक्ट लायसन्स. सिबिल क्रेडिट स्कोअर (Civil Credit Score) 500 असावा. राष्ट्रीयीकृत बँक खाते पासबुक (आधार व पॅन कार्डशी लिंक असणे अनिवार्य).
व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र/अनुभवाचा दाखला आणि प्रकल्प अहवाल (Project Report) व खरेदी करायच्या मालाचे कोटेशन. नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र (Affidavit).
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहिती व अर्ज मिळवण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार. दूरध्वनी: 02564- 210181 ईमेल: dm.slasdcnandurbar@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असेही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चव्हाण यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



