ताजा खबरे:
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*
*महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*

  • Share:

*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 70 हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
शासकीय विश्रामगृह, शहादा येथे मंगळवार, दिनांक 23 जून 2026 रोजी या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरा दरम्यान एकूण 71 रुग्णांची बीपी (रक्तदाब), शुगर (मधुमेह), नेत्र तसेच जनरल तपासणी करण्यात आली. यासोबतच 39 रुग्णांचे रक्त नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले. आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमूख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले. या शिबिराच्या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गिरीष पाटील, निलेश पाटील, माधुरी पालवे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे  वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, रुख्मिणी हॉस्पीटल (शहादा), जगदीश हॉस्पीटल (शहादा) आणि कांतालक्ष्मी शहा डोळ्यांचे हॉस्पीटल (नंदुरबार) यांचे अनमोल सहकार्य लाभले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार सुधाकर धामणे यांनी शिबिराच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
June, 25 2026
*'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा, ऑलिंपिक दौड व योगप्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष*
June, 25 2026
*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना सुरू*
June, 25 2026
*शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 70 हून अधिक रुग्णांची तपासणी*
June, 25 2026
*महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय*
June, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज