*दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रंजना बच्छाव यांची बिनविरोध निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रंजना बच्छाव यांची बिनविरोध निवड*
*दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रंजना बच्छाव यांची बिनविरोध निवड*
साक्री(प्रतिनिधी):-साक्री तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दहिवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. रंजना सुनिल बच्छाव यांची निवड करण्यात आली.24 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश गोकुळ वळवी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी सौ. रंजना सुनिल बच्छाव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक योगेश रविंद्र पाटील यांनी स्वाक्षरी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल काशिनाथ पाटील, योगेश रविंद्र बच्छाव, गणेश रमेश पिंपळसे, ज्ञानेश्वर पवार, शुभम देवरे, चि. सतीष मोरे, श्रीमती.धनुबाई सोनवणे, सौ. सरला ठाकरे, सौ. रोहिणी पाटील, सौ. सरलाबाई देसाई उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ गुरव, दिलिप नवल बच्छाव, भास्कर गंगाजी बच्छाव, एकनाथ माळी, काशिनाथ शंकर पाटील, जगन्नाथ हरी सुर्यवंशी, रामचंद्र बोरसे, भटु पाटील, उदय माळी, भुषण माळी, गौतम ईशी, राहुल सुर्यवंशी, शालिग्राम बच्छाव, माधव माळी, जगदीश बच्छाव, विजय नेरकर, दिनेश देसले, निलेश बच्छाव, राजेंद्र देवरे, विशाल खैरनार, प्रसाद सुर्यवंशी, बाबा माळेचे, दिपू सोनवणे, आनंद महाजन, रोहित कुंभार, अक्षय माळी, उमेश खलाणे, निरंजन सोनार, जयेश खैरनार दहिवेल गावाचे ग्रामविकास अधिकारी अशोक बच्छाव आदिंसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.



