*नंदुरबार येथे केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांचे हक्कांचे संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 अंतर्गत प्रमाणपत्र/ओळखपत्र वाटप शिबीर, रेशन कार्ड सहाय्य शिबीर, मतदार नोंदणी मोहीम आणि कायदेवि
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांचे हक्कांचे संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 अंतर्गत प्रमाणपत्र/ओळखपत्र वाटप शिबीर, रेशन कार्ड सहाय्य शिबीर, मतदार नोंदणी मोहीम आणि कायदेवि
*नंदुरबार येथे केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांचे हक्कांचे संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 अंतर्गत प्रमाणपत्र/ओळखपत्र वाटप शिबीर, रेशन कार्ड सहाय्य शिबीर, मतदार नोंदणी मोहीम आणि कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांच्या हक्कांसाठी संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाले आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथीय व्यक्तींकरिता विशेष शिबिरे/मोहिमा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 23 2026 रोजी स. 10 ते सायं.4 वाजेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा
परिषद समोर, नंदुरबार येथे केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांचे हक्कांचे संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 अंतर्गत प्रमाणपत्र/ओळखपत्र वाटप शिबीर, रेशन कार्ड सहाय्य शिबीर, मतदार नोंदणी मोहीम आणि कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमात एकूण 45 तृतीयपंथी व्यक्ती यांनी सहभाग नोंदविला.
सदर शिबिरात सर्वप्रथम दिपप्रज्वलन करण्यात येऊन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून सचिन वसंत जगताप, समाज कल्याण निरीक्षक यांनी कार्यक्रमाची प्रास्स्रविका उपस्थितांना समजावून सांगितली. तसेच उपस्थित तृतीयपंथी व्यक्तींना जिल्हा अभिरक्षक कार्यालयातील शासकीय अभियोक्ता अॅड. बी. एस. बिरारे, श्रीम. अॅड. सिमा खत्री यांनी केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती यांचे हक्कांचे संरक्षण कायदा, 2019 व नियम 2020 बाबत सलूना तसेच मार्गदर्शन केले. सदर शिबिरात अॅड. बी. एस. बिरारे, CYDA संस्थेचे सागर सनेर, समाज कल्याण निरीक्षक सचिन वसंत जगताप यांच्या हस्ते एकूण 18 तृतीय पंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच रेशन कार्ड सहाय्य शिबीर अंतर्गत एकूण 17 तृतीयपंथी व्यक्तींचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच आधार कार्ड व मतदार नोंदणी सहाय्य विशेष मोहीम अंतर्गत एकूण 15 तृतीयव्यक्तींचे आधार कार्ड संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येऊन नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पवार यांनी केले. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वसंत जगताप, समाज कल्याण निरीक्षक यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शंकर महाजन, सचिन पाटील, राकेश पावरा, राजेश ठाकरे, शुभम जावरे, ज्ञानेश्वर नांद्रे, श्रावण राक्षे, शुभम देवरे, अनिल नाईक, भावेश पवार, शैलेश नाईक, सुदाम वसावे, श्रीमती गौरी यांनी तसेच सर्व कर्मचारीवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.



