*पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी तसेच पदोन्नती व सरळसेवेने समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांना गुणानुक्रमे मिळाली आवडीची पदस्थापना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी तसेच पदोन्नती व सरळसेवेने समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांना गुणानुक्रमे मिळाली आवडीची पदस्थापना*
*पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी तसेच पदोन्नती व सरळसेवेने समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांना गुणानुक्रमे मिळाली आवडीची पदस्थापना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत शिक्षकांमधून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- 2025 अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे गुणानुक्रमे पदस्थापना देण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या 45 रिक्त पदांपैकी गुणानुक्रमानुसार समुपदेशनाद्वारे पारदर्शक पद्धतीने एकूण 44 शिक्षकांना सरळसेवेने केंद्रप्रमुख पदी पदस्थापना देण्यात आलेली आहे. तसेच एकूण 4 शिक्षकांना पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी पदावर बढती देण्यात आली असून शिक्षकांमधूनच पदोन्नतीने 6 शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर बढती देण्यात आलेली आहे.
पदोन्नती व समुपदेशन प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली योजना उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. पी. जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. बी. कंखर, विजय राजपूत, विस्तार अधिकारी रमेश गिरी, संकलन सहाय्यक स्वप्निल गावीत, परेश वळवी, स्वप्निल पाटील, मनोज अहिरराव, प्रविण पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. गुणानुक्रमे पारदर्शक पद्धतीने पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.