*तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन*
*तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र शासनाचा ‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019’ आणि ‘नियम 2020’ संपूर्ण देशात लागू झाले आहेत. या कायद्याच्या अनुषंगाने तृतीयपंथी व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करणे या उद्देशाने एका विशेष स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
हा मेळावा गुरुवार 25 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (जिल्हा परिषदेसमोर), नंदुरबार येथे संपन्न होणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहून विविध शासकीय व स्वयंरोजगार योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी (NGOs) या मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त तृतीयपंथी बांधवांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



