*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):- यथार्थ फाउंडेशन चॅरिटी ट्रस्ट, शहादा संचालित किडझोन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे सादरीकरण करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी शाळेचे मार्गदर्शक इम्रान पठाण, दिपक वळवी व राहुल पाडवी यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. योगामुळे एकाग्रता, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी आणि शिस्तीचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक निलेश भावसार, रीना वसावे, सुनंदा नाईक, प्रियांका पाडवी, आरती ढोले, रेखा सैंदाणे, भाग्यश्री वळवी, पायल पवार, भाग्यश्री पाडवी, शीला पाडवी व रिंकू वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेच्या मावशी चाय राठोड, जयाबाई पाडवी, अर्जुन पाडवी तसेच वाहनचालक जगदीश वळवी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून योगाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी, सुदृढ व सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.



